Gyanvapi Case : मोठी बातमी! हिंदू पक्षाला मिळाला ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार…


Gyanvapi Case : वाराणसी जिल्हा कोर्टाने हिंदू पक्षाच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला कोर्टाने दिला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे.

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जिल्हा प्रशासनाला सात दिवसांत पूजा करण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासनाने हे करताच पूजा सुरू होईल. जैन यांनी मशिदीच्या आवारात पूजा करण्याच्या नियमांवरही भाष्य केले आहे.

जैन म्हणाले की, पूजा कशी करायची याचा निर्णय काशी विश्वनाथ ट्रस्ट घेईल. त्यांना याबाबत चांगलेच माहित आहे. हे आमचे कायदेशीर काम होते जे आम्ही पूर्ण केले आहे. आता पूजा सुरू करणे काशी विश्वनाथ ट्रस्टवर अवलंबून आहे. भक्तांपासून पुजारी इ. प्रत्येकाला जाण्याची परवानगी दिली जाईल. Gyanvapi Case

मला म्हणायचे आहे की न्यायमूर्ती के.एम. पांडे यांनी १ फेब्रुवारी १९८६ रोजी राम मंदिराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले होते. त्या तुलनेत मला आजचा आदेश दिसतो. हा या प्रकरणाचा टर्निंग पॉइंट आहे.

एका सरकारने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हिंदू समाजाची पूजा बंद केली होती, आज न्यायालयाने आपल्या लेखणीने ती दुरुस्त केली आहे. या निकालाने कोर्टाचा मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!