आयकर विभागात नोकरीची मोठी संधी! दीड लाखांपर्यंत पगार, जाणून घ्या…


नवी दिल्ली : केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या आयकर विभागामध्ये भरती सुरु आहे. याअंतर्गत नोकरी मिळालेल्या उमेदवारांना १ लाख ४० हजारच्या वर पगार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांकडून कोणती लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

रिक्त पदांचा तपशील…

आयकर विभागाच्या या भरती अंतर्गत प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बीची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीद्वारे प्राप्तिकर विभागात एकूण ८ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

आयकर विभागात प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली संबंधित पात्रता पूर्ण केली असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील.

किती मिळेल पगार?

आयकर विभागात निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल 7 अंतर्गत पगार दिला जाणार आहे. म्हणजेच उमेदवारांना दरमहा ४४ हजार ९०० ते १ लाख ४२ हजार ४०० रुपये पगार दिला जाईल.

कुठे पाठवाल अर्ज?..

आयकर विभागाच्या या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरावा लागेल आणि संबंधित कागदपत्रांसह आयकर संचालनालय (प्रणाली),केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, तळमजला, E2,एआरए केंद्र, झंडेवालान विस्तार. या पत्त्यावर पाठवावा लागेल.

वयोमर्यादा ..

आयकर विभागात नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा जाणून घेऊया. आयकर विभाग भरती 2025 साठी 56 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group