आजोबांचा नादच खुळा!! दौंडमधील हौशी आजोबांनी नातवासाठी महाराष्ट्रातील सर्वात महागडा तमाशा आणला, मोजले १ लाख ४० हजार..

दौंड : दौंड तालुक्यातील एका आजोबांनी आपल्या नातवांच्या वाढदिवसासाठी चक्क महाराष्ट्रातील सर्वात महागडा रघुवीर खेडकर तमाशा, मनोरंजन म्हणून आयोजित केला होता. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या तमाशासाठी आजोबांनी एक लाख ४० हजार रुपये मोजले.
यामुळे परिसरातील लोक आजोबांचा नादच खुळा असे आता बोलू लागले आहेत. याबाबत माहिती अशी की, देलवडी येथील हौशी, माऊली वाघोले पाटील या आजोबांनी आपल्या तन्मय वाघोले पाटील व चिन्मय वाघोले पाटील या चिमुकल्या नातवांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
त्यांनी राज्यातील सर्वात मोठा रघुवीर खेडेकर हा लोकनाट्य तमाशा मनोरंजन म्हणून आयोजित केला. आजोबांनी यासाठी १ लाख ४० हजार रुपये मोजले. यामुळे आयुष्यभर लक्षात राहील असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केल्याने पंचक्रोशीतील लोकांसाठी हा चर्चेचा विषय बनला आहे.
या वाढदिवसाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. ४ वर्षापूर्वी नातवांच्या वाढदिवसानिमित्त आजोबांनी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन ठेवले होते. यापूर्वी वाढदिवसानिमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम केले आहेत. ही पहिलीच वेळ नाही.
यावेळी वेगळा प्रयत्न केला आहे. तमाशा लोककला आहे. ती कला जोपासण्याचा प्रयत्न याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला असल्याचे आजोबांनी सांगितले. यामुळे हा आजोबांची संपूर्ण पुणे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावेळी उपस्थित म्हणत होते आजोबांचा नादच खुळा.