Govinda : गोळी लागली की मारली? अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळा संशय, धक्कादायक माहिती आली समोर…

Govida : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या मिसफायर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. बंदूक साफ करत असताना गोविंदाला चुकून गोळी लागली. पायाला गोळी लागल्यानंतर रक्तस्त्राव बंद होत नसल्यामुळे गोविंदाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
गोविंदाला क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या गोविंदाच्या हेल्थबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशातच गोविंदाला लागलेल्या गोळीवर मात्र पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे गोविंदा गोळीबार प्रकरणाला आणखी नवं वळण मिळाल्याचं पहायला मिळाले आहे.
गोविंदा गोळीबार प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. बंदूक साफ करत असताना गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेवर पोलिसांना विश्वास बसत नाहीये.
मिळालेल्या माहिती नुसार, पोलीस गोविंदाच्या मताशी सहमत नाहीये. याप्रकरणी पोलिसांनी गोविंदाच्या लेकीचा जवाब नोंदवला आहे. याविषयी पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
दरम्यान, सध्या गोविंदाची तब्बेत पहिल्यापेक्षा ठीक आहे. त्याला ८-१० टाके पडले आहेत. डिस्चार्जविषयी प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की, पुढच्या दोन दिवसांमध्ये डिस्चार्ज करण्यात येईल. हे टाके गुडघ्याच्या दोन इंच खाली लागले आहेत. असे गोविंदाचे डॉक्टरने सांगितले आहे.