सरकारचा मोठा निर्णय: मुंबई -पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतुवर ‘या ‘वाहनांना टोलमाफी, पुणेकरांना सर्वाधिक फायदा


मुंबई : राज्य सरकारने टोलबाबत मोठा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी आता मुंबई-पुणे द्रुतगती महागाई, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू येथून प्रवास करणाऱ्या ई- वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरातील युवाहनांना याचा अधिक फायदा होणार आहे.

पुण्यात ई-वाहनांची संख्या ही १ लाखांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ई वाहनांवरील सवलत कमी केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यात ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यामध्ये घट झाली. त्यामुळेच राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने आदेश काढला आहे. या आदेशानुसार मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, अटल सेतू महामार्ग या मार्गांवर टोल भरण्याची गरज नाही. ई वाहन वापरामुळे इंधन खर्च वाचणार आहे. यामुळे प्रदुषणदेखील होणार नाही. त्यात हा टोलमाफीचा निर्णय घेतल्यामुळे ई-वाहन असणाऱ्यांना अधिकच फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंबलबजावणीसाठी महामार्ग प्राधिकरणांना सूचना देण्यात आली आहे.

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर केले. यामुळे ई-वाहनांना चालना मिळाली. याआधीदेखील इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने योजना सुरु केली होती. राज्य सरकारच्या या इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीच्या निर्णयाचा पुण्याला खूप फायदा झाला आहे. ई-वाहनांना या एक्सप्रेस वे आणि हायवेवरील ई वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. या निर्णयामुळे ई- वाहन असणाऱ्यांना फायदा होणार आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!