लाडक्या बहिणींसाठी सरकारचा मोठा निर्णय लवकरच; मंत्रालयात हालचालींना वेग..


पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता फक्त राज्यातीलच नव्हे संपूर्ण देशातील लाडक्या बहिणींसाठी, महिलांसाठी सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात उतरलं आहे.

महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने हा पुढाकार घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

महिला आरक्षणासाठी घेण्यात येणारं हे एक दिवसीय विशेष अधिवेशन में महिन्यात पार पडणार आहे. मात्र असं असलं तरी ते नेमकं कधी होणार याच्या तारखे संदर्भात अद्याप स्पष्टता नाही. पण लवकरच ती तारीख जाहीर होईल. या एकदिवसीय अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय आमदार भूमिका मांडणार असल्याचं समजतं.

आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारकडून “महिला आरक्षण विधेयक” मुद्द्यावर विशेष एक दिवसीय अधिवेशन साठी एकमताने ठराव करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितलं. महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर आता महाराष्ट्रात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यावर एकमत झाल्यास पुढच्या आठवड्यात एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे.

आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकार एकमताने निर्णय घेणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकार राज्याच्या राज्यपालांकडे विशेष अधिवेशन बोलण्यासाठी पत्र पाठवण्यात येणार आहे. त्या नंतर राज्यपाल महाराष्ट्र विधिमंडळाला विशेष अधिवेशन घेण्याची परवानगी देईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!