ब्रेकिंग! राज्यातील सरकारी नोकऱ्यांचे होणार खाजगीकरण, हालचालींना वेग…!


मुंबई : सध्या राज्य सरकारकडून शासकीय-निमशासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

यातून वाचणारा पैसा विकास कामांसाठी वापरला जाणार असल्याचे सांगण्यात यात आहे. दरम्यान, राज्यात एकीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष पेटला आहे. त्यासाठी तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

यावर सरकारकडून कोणता तोडगा काढला गेला नाही असे असताना आता राज्यातील शासकीय-निमशासकीय नोक-यांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे काय होणार लवकरच समजेल.

शासकीय, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसंच सरकारशी सबंधित अन्य कार्यालायातील नोकरभरती खाजगीकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!