पुनावाला ग्रुप या कंपनीचे नाव सांगून गुंडांनी महिलेची बळकावली जमीन, थेऊर येथील धक्कादायक घटना..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथे पूनावाला ग्रुप ऑफ कंपनीचे नाव सांगून गुंडांनी एका महिलेची जमीन बळकवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत शेतकरी महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान संबंधित महिलेचे क्षेत्र पूर्वेला असतानादेखील पश्चिमेला दाखवले असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भातील तक्रारही दिली असून मोठ्या कंपनीचे नाव सांगून धमकी देणाऱ्या गुंडांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील गट नबंर १२२ मधील काही क्षेत्र जयश्री पवार यांनी योहान पूनावाला यांच्याकडून खरेदीखताने विकत घेतले आहे. पवार यांची त्या गटात वहिवाट असून ठिबक व स्पिंकलरच्या सहाय्याने त्या पिके घेत आहेत. परंतु या शेतजमिनीचा ताबा घेण्याची नरेंद्र पाटील नावाच्या व्यक्तीने कपील पवार यांच्या गुंड टोळीला सुपारी दिली आहे. त्यानुसार काही व्यक्ती टोळक्याने गट नंबर १२२ मध्ये बेकायदेशीररित्या ताबा घेण्यासाठी घुसले. यावेळी पवार यांनी ११२ नबंर डायल करून पोलिसांना याबाबत माहिती दिली.त्यावेळी पोलीस आल्याने सर्वजण निघून गेल्याचे जयश्री पवार यांच्या तक्रारीत नमूद आहे.

जयश्री पवार यांची थेऊर येथील जमीन पूर्व दिशेला आहे. परंतु कंपनीच्या गुंडानी बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी पुर्व दिशेची जमीन पश्चिम दिशेला असल्याचे भूमी अभिलेखाच्या नकाशाच्या आधारे सिद्ध करून दाखविले आहे. म्हणजे गाव गुंडांची पोच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच खरेदीखतात जमिनीच्या चर्तुर्सिमा असतानादेखील प्रशासन गावगुंडांच्या पुढे झुकले तर नाही ना? अशी उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

नरेंद्र पाटील नामक व्यक्तीमार्फत कपिल पवार यांच्या गुंड टोळीने जयश्री पवार या वहिवाट करीत असलेल्या जमिन कसण्यासाठी अडथळा आणून धमकाविले आहे. गुंडांच्या धमकीमुळे महिला घाबरल्या असून त्यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. मात्र पूनावाला यांचे नाव वापरून शेतकरी महिलेवर जमीनी विकण्यासाठी दबाव टाकला जात आहे. असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

एकीकडे हवेली भूमि अभिलेख मोजणी कार्यालयाने केलेला अन्याय तर दुसरीकडे नरेंद्र पाटील यांच्या मार्फत गुंडाचा होणारा त्रास अशा प्रकारे थेऊर येथील शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले आहेत. गट नबंर १२२ च्या आसपासच्या शेतक-यांना शेती वहीवाटीसाठी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पूनावाला यांचे प्रतिनिधी आहोत असे सांगून संबंधित गुंड वहिवाटीस अडथळा आणत आहेत, त्यांच्या उपद्रवमूल्यास लगतधारक शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे या ‘आक्का’वर व टोळी प्रमुखावर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई? तेही पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
भरत कुंजीर (माजी उपसरपंच – थेऊर, ता. हवेली) –

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!