गुंडाचा घरात घुसून युवतीवर बलात्कार; खडकी परिसरातील घटनेने उडाली खळबळ..
पुणे : गुंडाने जबरदस्तीने घरात शिरुन एका १६ वर्षाच्या युवतीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १८ मार्च पासून वारंवार सुरु होता. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
यश धर्मेश कांबळे (वय २०, रा. खडकी बाजार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या युवतीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. फिर्यादी या १८ मार्च रोजी दुपारी घरात झोपल्या असताना कांबळे जबरदस्तीने आत आला. त्याने फिर्यादीवर बलात्कार केला.
त्यानंतर तो वारंवार फिर्यादीची येता जाता छेड काढत असे. लाज वाटेल अशा प्रकारे शरीरास स्पर्श करुन त्यांचा विनयभंग करत असे. या प्रकाराला कंटाळून शेवटी या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली.
यश कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.