आनंदाची बातमी!! राज्यात १५६०० कोटींचा ‘हा’ महामार्ग ९ महिन्यात होणार सुरु, जाणून घ्या..


मुंबई : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला मुंबई-गोवा महामार्ग (NH-66) पुढील ९ महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली आहे.

तसेच तब्बल १५,६०० कोटी रुपये खर्च, ४६० ते ४७१ किमी लांबी, आणि १३ वर्षांपासून सुरू असलेले काम अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एकदा हा महामार्ग पूर्ण झाल्यावर सध्याचा १३ तासांचा प्रवास अवघ्या ५ ते ६ तासांत करता येणार आहे.

मागील १३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आत्तापर्यंत सुमारे १५ हजार ६०० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती शुक्रवारी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे. हा महामार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहितीही या उत्तरात देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार व अन्य सदस्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामांबाबत विधानसभेच्या लेखी उत्तरातील माहिती तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावरील लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ही माहिती दिली आहे.

विधानसभेत देण्यात आलेल्या या उत्तरानुसार, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांपैकी एकूण ८४.६० किमी लांबीच्या रस्त्यापैकी ७४.८० किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून पनवेल ते कासू या उर्वरित ४२.३ किमी लांबीच्या रस्त्यावरील मोठे पूल- उड्डाणपुलाचे काम या महिन्यात म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच कासू ते इंदापूर या ४२.३ किमी लांबीच्या मार्गावरील मोठे पूल-उड्डाणपुलांचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याची योजना असल्याचं सांगण्यात आले आहे.

तसेच कशेडी घाटात दोन बोगद्यांपैकी एकाचे काम पूर्ण झाले असून, त्याद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उर्वरित बोगदा एप्रिल २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होईल.

महामार्ग नेमका कुठून जाणार?
पनवेल, पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी – पणजी – कानाकोना – मरगाव

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!