पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता रिंगरोडचे काम होणार सुरू

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सर्वात मोठी समस्या कोणती असेल तर ती वाहतूकीची समस्या आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले रिंगरोडचे काम दिवाळीत सुरू होणार आहे. तसेच जमीन संपदीत करणाऱ्या रकमेत देखील वाढ करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रिंग रोडसाठी 15 हजार 875 कोटींची पात्रता निविदा प्रसिद्ध झाली आहे. मावळ, मुळशी, खेड, हवेली, भोर या तालुक्यात हा रोड आहे. 172 किमीचा हा रिंगरोड असणार आहे. 2011 मध्ये याला राज्य सरकारने मान्यता दिली, मात्र पुढे अनेक अडचणी आल्या.

पुरंदर विमानतळासाठी देखील हा रोड उपयुक्त असणार आहे. यामुळे हा रोड अनेक कारणांनी फायदेशीर ठरणार आहे. या रोडला राज्य महामार्गाचा दर्जा देखील मिळाला आहे. यामुळे आता प्रत्यक्षात कामाला कधी सुरुवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
