पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला मिळणार ४ वंदे भारत ट्रेन, कसा असेल मार्ग? जाणून घ्या..

पुणे : केंद्र सरकारच्या वतीने पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहेत, यामुळे दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास अधिकच सुसाट होणार आहे. यामुळे पुण्याची हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. या चारही ट्रेन वेगवेगळ्या दिशांना धावणार आहेत. यामुळे हे फायदेशीर आहे.

यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या चार महत्वाच्या ठिकाणांशी पुण्याची नवी नॉन-स्टॉप रेल्वे कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. तसेच पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेनही सुरु होणार आहे, ज्याचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे.
यामध्ये या वंदे भारत ट्रेनचे थांबे दौंड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे असणार आहेत. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या भाविकांसाठी ही ट्रेन विशेष उपयुक्त ठरणार आहे. पारंपरिक धार्मिक प्रवास आता जलद आणि अधिक आरामदायक होणार आहे. यामध्ये काही दिवसात अधिकृत माहिती मिळणार आहे.

तसेच रेल्वे मंत्रालयाने पुणे-नागपूर स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे पुणे आणि उपराजधानी नागपूर एकत्र जोडली जाणार आहे. याचा फायदा व्यावसायिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना होईल. स्लीपर प्रकारामुळे रात्रीचा प्रवास सोपा आणि आरामदायक होईल. यामुळे हे देखील फायदेशीर होणार आहे.
पुणे-वडोदरा ट्रेन लोणावळा, पनवेल, वापी, सुरत येथे थांबू शकते. सध्या पुणे-वडोदरा प्रवासात सुमारे ९ तास लागतात, मात्र वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास ६ ते ७ तासांमध्ये पूर्ण होईल. ही ट्रेन दौंड, सोलापूर, गुलबर्गा या मार्गांवर थांबेल अशी शक्यता आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा यामधील रेल्वे संपर्क वाढणार आहे. याठिकाणी देखील अनेकजण प्रवास करतात.
पुणे-बेळगाव ट्रेन सातारा, सांगली, मिरज येथे थांबेल. यामुळे पुणेचा कर्नाटकच्या उत्तर भागाशी संपर्क वाढणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २-३ तासांचा वेळ वाचणार असून पर्यटन, शिक्षण व व्यापारासाठी ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात पुणेकरांसाठी ही एक फायद्याची बातमी समोर येणार आहे.