प्रवाशांसाठी खुशखबर ; नवरात्र उत्सवात साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी पिंपरी चिंचवड आगाराच्या विशेष बससेवा..


पुणे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रौत्सवात दरवर्षी तुळजापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगी गड या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) तर्फे भाविकांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड आगारातून साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी खास बससेवा सुरू करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने भाविकांसाठी खास उपक्रम राबवला आहे. 27 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता पिंपरी-चिंचवड आगारातून विशेष बससेवा सुरू होणार आहे. या प्रवासात पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रज, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, माहूरगड, सप्तश्रृंगी असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा पिंपरी-चिंचवड येथे आगमन होणार आहे.
या प्रवासाचे भाडे 3,101 रुपये प्रति प्रवासी ठरवण्यात आले असून तुळजापूर, माहूरगड आणि सप्तशृंगी येथे मुक्काम असणार आहे मात्र राहणे,जेवण आणि इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे.तसेच महिला सन्मान योजनेअंतर्गत एसटी बस मध्ये महिलांना 50 टक्के तिकीट सवलत मिळते ही सुविधा या विशेष शक्तिपीठ दर्शन बस मध्ये लागू असणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे भाविकांना सोयीस्कर प्रवास व सहज दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!