सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकार ‘या’ दिवशी करणार डीए वाढीची घोषणा..


नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. ही बातमी डीए वाढीशी संबंधित असून मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, महागाई भत्त्याबाबत सप्टेंबर महिन्यात घोषणा केली जाऊ शकते.

मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ अपेक्षित आहे, त्यानंतर डीए सध्याच्या ४२ टक्क्यांवरून वाढून ४५ टक्के होईल.

तसेच पीटीआयच्या मागील एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की केंद्र सरकार आपल्या एक कोटींहून जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए/डीआरमध्ये ४५ टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए/डीआरचा दर प्रत्येक महिन्याला कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या AICPI इंडेक्सच्या आधारे ठरवला जातो.

कामगार मंत्रालयाने ३१ जुलै रोजी जाहीर केलेले जूनचे सीपीआय-आयडब्ल्यू आकडे ३ टक्क्यांहून थोडे जास्त आहेत. सरकारकडून दशांश बिंदूचा विचार केला जात नाही.

ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, यावेळी आमच्याकडून डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र सरकार त्यात ३ टक्क्यांनी वाढ करून ४५ टक्के करेल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, सरकारने सप्टेंबरमध्ये डीए आणि डीआरमध्ये वाढ केली, तर त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होईल. प्रथम, अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग महसुली परिणामांसह डीएमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करेल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर १ जुलै २०२३ पासून तो लागू केला जाईल. सध्या केंद्र सरकारचे एक कोटीहून जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत. सध्या त्यांना मूळ वेतन/पेन्शनच्या ४२% हिशोबाने डीए/डीआर मिळत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!