सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सोनं ‘इतक्या’ हजारांनी झाले स्वस्त, जाणून घ्या दर..


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे.

अशातच आता लग्नसराईच्या तोंडावर दर कमी झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी वायदे बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा डिसेंबर वायदा तब्बल १०८६ रुपयांनी कमी होऊन १,२३,२६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला.

दिवाळीपूर्वी सोन्याने १.३५ लाखांचा टप्पा गाठला होता, मात्र आता दररोज हजारो रुपयांची घट होत आहे. सराफा बाजारातही ही घसरण दिसून येत आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१५,४१० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२५,६१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

मागील आठवड्याप्रमाणेच या आठवड्याची सुरुवातही ग्राहकांसाठी आनंददायी ठरली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव आता १,५४,९०० रुपयांवर आला आहे.

दिवाळीपूर्वी २ लाखांच्या घरात गेलेली चांदी आता लक्षणीयरीत्या स्वस्त झाली आहे. मागील काही दिवसांत चांदी एका दिवसात १०,००० रुपयांनी आणि ६,००० रुपयांनीही स्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, दिवाळीनंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू होत आहे. या काळात सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. सहसा दिवाळीनंतर दर वाढलेलेच दिसतात, मात्र यंदा दर कमी झाल्याने हा लग्नसराईचा हंगाम ग्राहकांसाठी शुभ ठरू शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!