लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!! आता होळीनिमित्त मिळणार साडी, राज्य सरकारचा निर्णय…

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणत १५०० रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरु केले. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले. आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
याबाबत आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत. यामुळे महिलांना ही एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
याबाबत माहिती अशी की, लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
यामध्ये आता जळगाव जिल्ह्यात रेशन दुकानावर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील १ लाख ३५ हजार ३०२ महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार आहे, याबाबत माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर साड्या दिल्या जाणार आहेत.
या साड्यांचा रंग आणि दर्जा कसा असणार हे लवकरच समजणार असून यामुळे महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहे. याबाबत राज्य सरकारकडून आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. यामुळे महिला खुश आहेत.