मोबाईलचा टॉर्च लावून आत बसमध्ये जा, नराधमाने पुण्यातील पीडित तरुणीला काय सांगितलं? भयंकर माहिती आली समोर…


पुणे : आज स्वारगेटमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. येथील बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला. यामुळे खळबळ उडाली आहे.

सध्या पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. पहाटे पुण्यातील एस टी स्टँड वर धक्कादायक घटना घडली आहे. 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. यावेळी ही घटना घडली आहे. हा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत आरोपी आणि पीडित तरुणीत काय संवाद झाला, याची माहिती समोर आली आहे. पहाटे ही तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती. यावेळी आरोपीने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले.

असे असताना माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही, असे त्या मुलीने त्या आरोपीला सांगितले. तरुणी एकटी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला बोलण्यात गुंतवले. तरुणीचा आरोपीच्या बोलण्यावर विश्वास बसला. एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती.

या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं सांगितले. त्यावर आरोपीने हीच बस फलटणसाठी जाणार असल्याचे सांगितले. मुलीला काहीतरी गडबड वाटली मात्र तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळेत निघणार असल्याचे सांगितले.

तरुणी बसमध्ये शिरताच तिच्या पाठोपाठ आरोपी देखील बसमध्ये शिरला. त्याने आत येताना दरवाजा
लागला होता. यावेळी त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिला सीटवर फेकल्याने तिला बाहेर पडणे शक्य झालं नाही. तसेच काचा बंद असल्याने तिला आवाजही करता आला नाही. त्यानंतर त्याने तरुणीवर अत्याचार केला आणि पसार झाला.

या स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, अशातही आरोपीने या तरूणीवरती एसटी बस स्थानकामध्ये असे कृत्य केल्याने महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत तपास सुरू आहे. तरूणी दुसऱ्या बसने घरी पोहोचली तेव्हा तिने हि घटना घरी सांगितली.

त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!