माझ्या जीवाला धोका!! २४ तास मदतनीस द्या, नावही सांगितलं, वाल्मिक कराड यांची मोठी मागणी…

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सध्या सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कोठडीमध्ये कराडला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप होत आहे.
अशातच आता वाल्मिक कराडने आपल्याला गंभीर आजार असल्याचा दावा करत मदतनीस म्हणून खास व्यक्तीच्या नावाची शिफारस केली आहे. वाल्मिक कराड याने न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लीप ॲप्निया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली आहे.
दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी १५ दिवसाच्या सीआयडी कोठडीत करण्यात आली आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यान त्याने मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत २४ तास मदतनीस देण्यात यावी अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मशीन वापरण्यासाठी रोहीत कांबळेने प्रशिक्षण घेतले असून मशीन चुकीच्या पध्दतीने लावल्यास आपल्या जिवीतास धोका असल्याचा धक्कादायक दावा कराडने केला आहे. त्यामुळे रोहीत कांबळेला आपल्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये विनंती वाल्मिक कराडने केली आहे. वाल्मिक कराडच्या या दाव्यावर न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.