Breaking News : पुण्यातील खडकवासला धरण परिसरात 9 मुली बुडाल्या, 7 जणींना वाचवण्यात यश

पुणे : पुण्यातील खडकवासला धरण परिसरात 9 मुली पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या ९ मुलींपैकी ७ जणींना वाचवण्यात यश आलं असून दोघी अद्याप बेपत्ता आहेत.
स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवता आले. याबाबत त्यांची माहिती अजून समोर आली नाही. पोलीस आणि बचाव पथक मदत करत आहेत.

याबाबत काही स्थानिकांना माहिती मिळाली. त्यांनी बचाव पथकाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लागली.

Views:
[jp_post_view]