सबसे कातील गौतमी पाटील! गौतमी पाटीलचे स्वप्न अखेर पूर्ण, म्हणाली…


पुणे : डान्सर गौतमी पाटीलबाबत एक बातमी समोर आली आहे. गौतमी पाटील आता लवकरच सिनेमात दिसणार आहे. घुंगरू चित्रपटाच्या माध्यमातून गौतमी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

माढ्यात या सिनेमाचं चित्रीकरण आता पूर्ण झालं आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घुंगरू सिनेमा लोककलावंताची व्यथा मांडणारा आहे. त्यामुळे घुंगरू महाराष्ट्रातील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

 

 

 

 

 

 

 

कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक करत असतात. प्रेक्षकांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचली आहे. माझ्यावर जसं प्रेम केलं, तसंच घुंगरू चित्रपटावरही प्रेम करावं. हा सिनेमा पाहावा. हा माझा पहिलाच सिनेमा आहे, असं गौतमी पाटीलने सांगितलं.

यामुळे आता हा चित्रपट कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हा सिनेमा किती जादू दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!