Gautami Patil : गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ! आता सोलापूर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय..

Gautami Patil l सोलापूर : नृत्यांगणा’ गौतमी पाटील नेहमीच आपल्या नृत्यामुळे कायम चर्चेत असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमात वाद, गोंधळ होणं सुरुच असत.मात्र गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
गौतमी पाटील हिचा जिथे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होतो. दरम्यान, कोणत्या न् कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलसाठी एक वाईट बातमी आहे. Gautami Patil
सोलापुरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.
सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.
मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी आयोजकाना पत्र दिले आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवच्या काळात देखील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास राज्यात काही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली होती.