घनश्याम दराडेवर भडकली गौतमी पाटील; म्हणाली, ‘तुम्हाला फक्त मीच…

पुणे : सध्या राज्यात गौतमी पाटीलचीच हवा आहे. गौतमी माहित नाही असा माणूस सध्या बघायक घावणार नाही. जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. गौतमीचा डान्स होत असताना बऱ्याचदा कार्यक्रमात बसायला जागा नसते.

दरम्यान छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्याम दराडे याने केलेल्या व्यक्तव्यामुळे गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. घनश्याम यांच्या टीकेला गौतमी पाटीलने उत्तर दिले आहे.
गौतमी पाटील म्हणाली, ‘मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी मागेच सोडून दिल्या आहेत. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच दिसते का? बाकी इतर महिला दिसत नाहीत का? एकदा माझा कार्यक्रम पाहा आणि मगच त्यावर आक्षेप घ्या’. मी काय महाराष्ट्राचा बिहार केलाय का दादा? असा प्रश्न गौतमी पाटीलने छोटा पुढारी घनश्याम दराडे याच्यासमोर उपस्थित केला आहे.

Views:
[jp_post_view]