Gautam Gambhir : गौतम गंभीरला दिल्ली हायकोर्टाचा मोठा दिलासा, ‘या’ प्रकरणात दिले महत्वाचे निर्देश..

Gautam Gambhir : भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. गंभीरवर फसवणुकीचा आरोप होता. हा आरोप फेटाळून दिल्ली हायकोर्टने गंभीरला तात्पुरता दिलासा दिला आहे.
गौतम गंभीरने उच्च न्यायालयात धाव घेऊन सत्र न्यायालयाच्या फसवणुकीच्या खटल्यातून मुक्त करण्याचा सत्र न्यायालयाच्या आदेश रद्द ठेवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यालयाचा आदेशाला स्थगिती दिली आहे. Gautam Gambhir
काय आहे प्रकरण?
रुद्र बिल्डवेल, एचआर इन्फ्रासिटी आणि यूएम आर्किटेक्चर्स या गृहनिर्माण कंपन्यांनी घर खरेदीदारांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. संबंधित कंपन्या आणि संचालकांवर फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खटलाही दाखल करण्यात आला.
रुद्र बिल्डवेल कंपनीचा गौतम गंभीर हा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा तक्रारीत समावेश होता. मात्र सत्र न्यायालयाने गौतम गंभीर यांच्यासह अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर गृहखरेदीदारांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी आज गंभीरविरुद्धच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. याचिकाकर्त्याच्या विरुद्धच्या आदेशाला स्थगिती राहील. या प्रकरणी मी आदेश पारित करीन, असेही न्या. ओहरी यांनी स्पष्ट केले आहे.