पुण्यात वाढतेय नशा!! तब्बल एक कोटी रुपयांचा ५२० किलो गांजा जप्त, परराज्यातील महिलेसह तिघांना बेडया, गुन्हे शाखेची मोठी कारवाई..


पुणे : आंध्रप्रदेशातून विक्रीसाठी आणलेला एक कोटी रुपयांचा ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक -२ ने ही मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई शनिवारी (ता. २) पुणे नगर रोडवरील अर्मसेल इंडिया कंपनीच्या समोर करण्यात आली.

संदीप बालाजी सोनटक्के (वय. २९ रा. मुपो. दहिवली, पाली फाटा, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड), निर्मलाकोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी (वय. ३६ रा.चिलाकरलुपेठ, जि.गंटुर, राज्य आंध्रप्रदेश, महेश तुळशीराम परीट (वय. २९ रा. तुपगाव पोस्ट चौक, ता. खालापूर, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना माहिती मिळाळी की, एका पांढऱ्या रंगाची सेलेरिओ कार(एमएच 46 बीव्ही 4560) आणि स्कॉर्पिओ (एमएच 48 झेड 8881) या वाहनांना महाराष्ट्र शासनाची) पाटी लावुन आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रिसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी पुणे नगर रोडवरील अर्मसेल इंडिया कंपनीसमोर स्कॉर्पिओ गाडी आडवली. या गाडीवर लोकसेवक नसताना आरोपींनी लोकसेवक असल्याचे भासवण्यासाठी गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. पोलिसांनी गाडीतील संदीप सोनटक्के व महिलेला ताब्यात घेतले.

तर सेलेरिओ गाडीमधील महेश परीट याला ताब्यात घेऊन गाड्यांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी तिघांकडून१ कोटी `१९ लाख ८२ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

यामध्ये १ कोटी ४ लाख ११ हजार रुपये किंमतीचा ५२० किलो ५५० ग्रॅम वजनाचा गांजा, ९ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ, ६ लाख रुपये किमतीची सेलीरीओ कार, ७१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल व २००रुपयांचा बोर्ड असा ऐवज जप्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!