इंदापूर येथे शेतकऱ्यांच्या मोटारी, सोलर प्लेट्स आणि शेळ्या-बोकड चोरी करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, उरुळी कांचन येथील दोघांचा समावेश..


इंदापूर : इंदापूरसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या मोटारी, सोलर प्लेट्स आणि शेळ्या-बोकड चोरणारी टोळीला अटक करण्यात आली आहे. इंदापूर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी उरुळी कांचन येथील दोघांसह ५ जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, यामध्ये एका विधीसंघर्षीत बालकाचा देखील समावेश आहे. आरोपींनी २१ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. साहिल विलास चौधरी रा. उरुळी कांचन ता. हवेली) रोहित दत्तत्रय कटाले (रा. उरुळी कांचन ता. हवेली), खंडु उर्फ राहुल अशोक महाजन (वय -१९), रा. वडापुरी), सचिन अरुण कांबळे (रा. वरकुटे खुर्द ता. इंदापुर), व एक विधीसंघर्षीत बालक, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मागील २ वर्षांपासुन शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या पाण्याच्या मोटारी, शेळया बोकडे तसेच विहीरीवरील चोरीस गेलेल्या सोलर प्लेटा असे एकूण २१ गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वडापुरी ता. इंदापुर हद्दीतील वरकुटे खु रोडवरुन बद्रीनाथ रामु राठोड (वय.३० वर्ष रा. भगवान बाबानगर रुई ता. बरामती) यांचे दोन कामगारांना अज्ञात दोन आरोपीतांनी मारहाण करुन त्यांचेकडून त्याचा मोबाईल, मोटारसायकल, ट्रकची बॅटरी व रोख रक्क्म २ हजार असा २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चाकुचा धाक दाखवुन लुटून नेल्याची तक्रार देण्यात आली होती.

सदर घटनेचा इंदापूर पोलिसांचे गुन्हे शोध पथक तपास करीत असताना गुप्त बातमीमार्फत सदरचा गुन्हा करणाऱ्या खंडु महाजन (वय- १९) व एक विधीसंघर्षीत बालक आरोपींना ताब्यात घेतले. त्याचेकडे विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच 28 हजार रुपयांचा मुदद्दे‌माल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार सचिन कांबळे, साहिल चौधरी, रोहित कटाले, मागील २ वर्षांपासुन गोरगरीब शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या पाण्याच्या मोटारी व शेळया बोकडे तसेच विहीरीवरील चोरीस गेलेल्या सोलर प्लेटा हे देखील चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांची चौकशी केली असता आरोपींनी 8 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!