Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा मोरया! आता गणेश उत्सवानिमित्त वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मिळणार अनोखी भेट, जाणून घ्या…


Ganesh Chaturthi 2023 मुंबई : राज्यात मुंबई-सोलापूर, मुंबई- शिर्डी, नागपूर-बिलासपूर आणि मुंबई-मडगाव अशा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. या वंदेभारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनोखी भेट आयआरसीटी देणार आहे. गणेश उत्सवानिमित्त ही भेट देणार आहे. (Ganesh Chaturthi 2023)

राज्यात धावणाऱ्या पाच ‘वंदे भारत’ ट्रेन  (Vande Bharat Express)आहेत. या सर्व ट्रेनमध्ये गणेशोत्सवानिमित्त (Ganesh Chaturthi 2023) भेट देण्याचा निर्णय इंडियन रेल्वे केटरिंग ॲण्ड टुरिझम महामंडळाने म्हणजे आयआरसीटीसीने घेतला आहे. वंदे भारतमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोदक देण्यात येणार आहे.

यासाठी साडेचार हजार मोदकांची ऑर्डर दिली गेली असल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. गणेश चतुर्थी आणि दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना मोदक दिले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना जेवणाबरोबर मोदकचा स्वाद मिळणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेस बरोबरच कोकण मार्गावर धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यात देखील जेवनामध्ये मोदक देण्याचे नियोजन आयआरसीटीसीकडून केले जात आहे. मोदक मिळाल्यास त्या मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांना मोदक दिले जाणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबत आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरवाला यांनी सांगितले, की वंदे भारत एक्स्प्रेसमधील प्रवाशांना जेवणात मोदक प्रसाद म्हणून देण्याचे नियोजन केले जात आहे. १९ व २० सप्टेंबर रोजी प्रवाशांना मोदक दिले जातील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!