मित्रानेच केला घात! जिवलग मित्राच्या पत्नीवर जडलं प्रेम, लव्ह स्टोरीचा धक्कादायक शेवट, घटनेने महाराष्ट्र सुन्न..

भंडारा : जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या जीवलग मित्राची हत्या केली आहे. मयत तरुणाचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. याच कारणातून दोघांमध्ये वाद झाला होता. यातूनच ही घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तुमसर याठिकाणी दोस्तीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी दोन्ही मित्र आमने सामने आल्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि एकाने दुसऱ्या तरुणाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दोघंही भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील रहिवासी होते. अंकुश साठवणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर रामेश्वर उर्फ मुन्ना बिरणवारे असं आरोपी तरुणाचं नाव आहे. मयत अंकुश आणि रामेश्वर हे एकमेकांचे एकेकाळचे जिगरी मित्र होते. मात्र ही माहिती झाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरु होता.
गेल्या काही दिवसांपासून अंकुशचे रामेश्वर याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध सुरू होते. ही बाब रामेश्वरला समजल्यानंतर काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. या वादानंतर अंकुशने आपलं गाव सोडलं आणि तो नागपूरला राहायला गेला. त्यानंतर हे प्रकरण थंड झालं होतं. मात्र शनिवारी गावात ग्रामपंचायतीची मिटींग होती.
अंकुश हा ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याने तो गावात मिटींगसाठी आला होता. यावेळी अंकुशच्या वडिलांनी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आरोपी रामेश्वरला आपल्या घरी बोलवून घेतलं. पण हा वाद मिटण्याऐवजी वाढला. रामेश्वरने थेट चाकुने अंकुशवर सपासप वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अंकुश घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर अंकुशला तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, याठिकाणी उपचारादरम्यान अंकुशचा मृत्यू झाला. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.