मोफत दारू व हँगओव्हर झाल्यास मिळणार रजा! लाखोंचा पगारही, कोणती आहे ही कंपनी?, जाणून घ्या…

नवी दिल्ली : विचित्र ऑफर देणारी एक कंपनी सध्या चर्चेत आली आहे. या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये फ्री दारूची ऑफर दिली आहे. नशा चढली तर ब्रेक आणि हँगओव्हर चढला तर सुट्टीही ही कंपनी देत आहे.

कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी एक कंपनी कर्मचाऱ्यांना दारू ऑफर करते, तीसुद्धा फ्रीमध्ये. ऑफिसमध्येच कर्मचारी दारू पिऊ शकतात. स्वतः बॉसही कर्मचाऱ्यांसोबत दारू पितो. काम करता करता दारूही पिता येते. दारू चढली तर घरी पाठवलं जातं.
त्यानंतरही हँगओव्हर असेल, ऑफिसला येण्याच्या अवस्थेतच कर्मचारी नसेल तर त्याला नशा उतरण्यासाठी सुट्टीही दिली जाते. बड्या कंपन्यांकडे असतं तसं बजेट या कंपनीचं नाही. ही कंपनी कर्मचाऱ्यांना जास्त पगार देऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीने ही अशी ऑफर कर्मचाऱ्यांना दिली आहे.

कंपनीच्या सीईओनं सांगितले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांना जास्त पैसे देऊ शकत नाहीत त्यामुळे ते एक वेगळं कल्चर देऊ करत आहे. ते कर्मचाऱ्यांना अशी गोष्ट देतात जी त्यांना पैशांपेक्षा जास्त आवडते.
मिळालेल्या माहिती नुसार, कंपनीची सुरुवातीचीच सॅलरी २२२,००० येन म्हणजे तब्बल १ लाख २७ हजारपेक्षाही जास्त आहे. कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचेही पैसे दिले जातात. आता ही कंपनी कोणती, ती आहे कुठे, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. ट्रस्ट रिंक को. लिमि. असं या कंपनीचं नाव आहे. ही एक टेक कंपनी आहे जी जपानच्या ओसाकामध्ये आहे.
याआधी दारू पाजून मुलाखत घेणारी कंपनीही चर्चेत आली होती. नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीने त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने मुलाखतीसाठी वापरलेल्या वादग्रस्त पद्धतीबाूक सोशल मीडिया रेडिटवर सांगितलं होतं. त्याने सांगितलं की त्याने अलीकडेच एका कंपनीची मुलाखत दिली होती.
ज्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्याला सेल्स इंजिनअर्सची मुलाखत घेण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं. ते नेहमीप्रमाणे मुलाखत घेत असत मात्र संध्याकाळी ते सर्वजण दारू पिण्यासाठी बाहेर पडायचे आणि मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भरपूर दारू पाजण्याचा प्रयत्न करायचे.