मोठी बातमी! बारामतीत बायोगॅसच्या टाकीत गुदमरून चौघांचा मृत्यू


 

बारामती : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बायोगॅसने चार जणांचा प्राण घेतला आहे. बायोगॅस टाकीची साफसफाई करताना एकाच कुटुंबातील चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

त्यांचा मृत्यू गुदमरून झाला आहे. बारामती शहरातील रुग्णालयात त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे, बापुराव लहुजी गव्हाणे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

 

खांडज गावच्या हद्दीत असलेल्या आटोळेवस्ती येथे ही घटना घडली. गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बायोगॅसची ब्रिटीशकालीन पाईपलाईन साफ करताना ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

 

घटनेनंतर तात्काळ चौघांना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये पिता पुत्राचा देखील समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!