मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या माजी आमदार अशोक टेकवडेसह संपूर्ण कुटूंबावर बनावट कर्ज लाटून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! शिरुर तालुक्यातील दोघा शेतकऱ्यांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल…

शिक्रापूर : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील एका शेतकऱ्याच्या जमिनीवर कर्ज काढून 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह 11 जणांविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सचिन बाळासाहेब गरुड (रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे, दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, विजया अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, गणेश अंकुश जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील सचिन गरुड, त्यांच्या दोन मित्रांना 2019 मध्ये व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवे असल्याने त्यांनी अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याकडे दोन वेगवेगळे कर्ज मागणी केली असता सदर बँकेने सचिन गरुड यांच्या गणेगाव दुमाला येथील जमिनीचे गहाणखत करून घेत अनेक कागदपत्रे घेतले होते

त्यांनतर सदर अजित मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटी सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड या दोन्ही बँकांकडून त्यांना कर्ज दिले असे सांगून वेळोवेळी टाळाटाळ केली. दरम्यान एका कति 40 लाख तर एका कति 25 लाख असे 65 लाख रुपये कर्ज मंजूर करून त्याबाबत जमिनीवर बोजा लावून कर्जदारांच्या कर्जाची रक्कम त्यांना न देता सर्व पतसंस्थेचे संस्थापक, चालक व व्यवस्थापक यांनी संगनमत करून स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग करून घेतली.
दरम्यान, 2023 मध्ये त्यांना कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस आली. त्यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनतर त्यांनी शिरुर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने याबाबत सुनावणी घेत शिरुर पोलिसांना या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरुन पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत.
