झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास…

झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं. ते दीर्घकाळापासून आजारी होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

गंगाराम रुग्णालयात नेफ्रोद डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती. त्याशिवाय प्रकृतीच्या आणखी सुद्ध समस्या होत्या. ते ८१ वर्षांचे होते. गुरुजी आपल्या सर्वांना सोडून निघून गेले अशा शब्दात झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन वडिलांच्या निधनाची माहिती दिली. ‘आदरणीय दिशोम गुरुजी आपल्या सर्वांना सोडून गेलेत. आज मी शुन्य झालोय’

शिबू सोरेन यांच्यावर दीर्घकाळापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना २४ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. “त्यांना नुकतच रुग्णालयात दाखल करण्यात आलय. आम्ही त्यांना पहायला आलोय. प्रकृती स्वस्थासाठी त्यांच्या तपासण्या सुरु आहेत” असं हेमंत सोरेने म्हणाले होते.
शिबू सोरेन हे झारखंड राज्य बनवण्यात आघाडीवर होते. त्यांचे प्रशंसक त्यांना गुरुजी म्हणून बोलवायचे. तीनवेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री बनले. एकदाही ते आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. बिहारापासून वेगळ्या झालेल्या झारखंडचे ते 2005 साली तिसरे मुख्यमंत्री बनले. २००५ साली आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान ते फक्त १० दिवस, २००८ साली दुसऱ्या कार्यकाळात एक वर्ष आणि तिसऱ्या कार्यकाळात काही महिने मुख्यमंत्री राहिले.