जबरदस्तीने शारीरिक संबंध, बेडरूममध्ये कॅमेरा; नवऱ्याचं सत्य समजताच खळबळ, नेमकं घडलं काय?

कानपूर : एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीने लपवलेल्या कॅमेऱ्याने अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आणि जबरदस्तीने सेक्स केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. हा प्रकार कानपूरमध्ये घडला आहे. महिलेने पती आणि दिराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
नेमकं घडलं काय?

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वरूप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने पतीवर फसवणूक आणि छळाचा आरोप केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये कल्याणपूर येथील एका प्रॉपर्टी डीलरसोबत तिचा विवाह झाला होता.
लग्नामध्ये तिच्या घरच्यांनी ऐपतीपेक्षा जास्त हुंडा दिला होता, तरीही पती आणि दीर अतिरिक्त हुंड्याची मागणी करत होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.

पीडितेचा आरोप आहे की, तिचा पती बेडरूममध्ये लपवलेला कॅमेरा लावून तिचा अश्लील व्हिडिओ बनवत असे. जेव्हा तिने याला विरोध केला, तेव्हा पतीने तिला मारहाण केली आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
दरम्यान, महिलेला समजले की तिच्या पतीचे आधीच लग्न झालेले आहे. तिने याबद्दल विचारणा केली असता, सासरच्यांनी तिला मारहाण करून घरातून बाहेर काढले. तिचा दीर आणि पती दोघांनी तिला धमकावले की, जर तिने जास्त विरोध केला तर ते तिचा खासगी व्हिडिओ व्हायरल करतील.
महिलेने असाही आरोप केला आहे की, तिच्या पतीचे इतर अनेक महिलांशी संबंध होते. तिने याबद्दल विचारले असता, पतीने तिला धमकावले आणि गप्प राहण्यासाठी त्रास दिला.