आधी बिल्डरचं अपहरण, मग विवस्त्र करत मारहाण, बीड पाठोपाठ संभाजीनगर हादरलं..


छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी अपहरण करून संतोष देशमुखांना वायर, लाथा बुक्क्या, लोखंडी रॉड आणि लाकडाने बेदम मारहाण केली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.

आता ही घटना ताजी असताना संभाजीनगरमध्ये देखील या घटनेची पुनरावृत्ती घडली. येथील एका बिल्डरसह त्यांच्या साथीदाराचं १५ जणांच्या टोळीने बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केलं. त्यानंतर आरोपींनी विवस्त्र करत दोघांना बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बिल्डर आणि त्याच्या साथीदाराचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले. तसेच त्यांनी नग्न करून पट्ट्याने दोघांना मारहाण केली.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बंदुकीचा भाग दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तुला मारून डोंगरात फेकून देतो, अशा शब्दांत आरोपींनी धमकी दिली आहे.

विशेष म्हणजे शिरसाटचा भाऊ पोलीस कर्मचारी असून तो देखील या गुन्ह्यात सहभागी होता. सातारा परिसरातील सुधाकरनगरात ही घटना घडली असून शरद राठोड असे मारहाण झालेल्या बिल्डरचे नाव आहे. फिर्यादीने थेट पोलीस आयुक्ताला जाऊन तक्रार करत बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर तो गुन्हा सातारा पोलीस ठाण्यात वर्ग करून संदीप शिरसाट या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!