पुण्यात पहिला हापूस आंबा दाखल! ३१ हजार रुपये डझनाने मिळाला भाव…


पुणे : फळांचा राजा आंबा न आवडणारी व्यक्ती विरळच, आंबा त्यात हापूस आंब्याचा सुंगध जरी सुटला तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे तर आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. या आंब्याचा सिझन अजून सर्वसामान्यांच्यासाठी सुरु झालेला नाही.

काही जण अक्षय तृतीयेनंतर आंबा खाण्यास लोक सुरुवात करतात. आंबा फळ असे आहे की जर खरी कोणी आमरस केला असेल तर या या..आमच्या घरी आमरस पुरीचा बेत आहे असं कोणी आवतण देत नाही.

कारण हे फळ मोसमाआधीच चाखायचे असेल तर खिशात भरपूर नोटा असाव्या लागतात. अशात आंबा खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी देवगडमधील केशर हापूसची पहिली पेटी दाखल झाली.

त्याला तब्बल ३१ हजार रुपये इतका भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध भोसले यांच्या गाळ्यावर लिलाव झाला.

देवगड येथील शेतकरी साद मुल्ला यांच्या बागेतून ही आवक आली आहे. सव्वापाच डझनाची ही पेटी व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी खरेदी केली आहे. या वेळी भाजपाचे नेते बाबा मिसाळ, फळे व भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, गौरव घुले, युवराज काची, अरुण वीर, रोहन जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, यंदा पाऊस जास्त झाल्याने आंब्यांची आवक सुरळीत सुरू होण्यास काहीसा उशीर होईल. येत्या १५ मार्चपासून आवक नियमित सुरू होईल. आंब्यांचा दर्जा चांगला राहील, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन १० ते २० टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!