आधी ईडी, आता सीबीआयचा अनिल अंबानींच्या घरावर छापा; 17000 कोटींच्या कर्जाचा घोटाळ्याचा आरोप..


पुणे : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांच्या घरावर ईडीनंतर सीबीआयनं छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.तब्बल १७ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने आज सकाळी मुंबईतील कफ परेड येथील सीविंड या निवासस्थानी छापा टाकला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सातच्या सुमारास सीबीआयचे ७-८ अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. छाप्यादरम्यान अनिल अंबानी आणि त्यांचे कुटुंब घरी उपस्थित होते. ईडीच्या कारवाईनंतर आता सीबीआयनंही कारवाई सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.सीबीआयनं रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि अंबानी यांच्या प्रोजेक्ट्सशी संबंधित काही ठिकाणी छापे घालत एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीनं १७ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.त्यानंतर आता सीबीआयने छापा टाकला.घोटाळ्यातील कथित गैरव्यवहारामुळे स्टेट बँकेला तब्बल २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अंबानी यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मागणी केली होती, मात्र तपासकर्त्यांना अद्याप समाधानकारक माहिती मिळालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!