मुंबईत अग्नितांडव ; गोरेगाव पश्चिमेतील राजाराम लेन परिसरात भीषण आग, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू


मुंबई :मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतील भगतसिंग नगर, राजाराम लेन परिसरात पहाटे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत बहिण भाऊ आणि बापाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील राजाराम लेन परिसरातील ग्राउंड प्लस एक मजली इमारतीतील तळ मजल्यावरील विद्युत वायरिंग व घरगुती साहित्याला अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की,आगीचे लोळ पहिल्या मजल्यावरील एका खोलीत पोहोचले, जिथे तीन जण झोपेत असताना त्यांच्या कपड्यांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. आणि आग आटोक्यात आणली.

दरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले. मृतांमध्ये हर्षदा पावसकर (वय १९), कुशल पावसकर (वय १२) आणि संजोग पावसकर (वय ४८) यांचा समावेश आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस व अग्निशमन विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!