Fire News : पुण्यात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ‘एवढ्या’ ठिकाणी आगीच्या घटना, अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ..


Fire News : पुण्यात दिवाळीतील महत्वाचा सण लक्ष्मीपूजन रविवारी जल्लोषात साजरा करण्यात आला. मात्र याच या दिवशी पुण्यात आगीच्या देखील मोठ्या घटना घडल्याच्या उघडकीस आल्या. पुण्यात रात्री ७ ते १२ च्या दरम्यान, तब्बल २३ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. यामुळे अग्निशामक दलाची चांगलीच धावपळ उडाली.

रविवारी दिवाळीनिमित्त सायंकाळी शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यांमुळे वेगवेगळ्या भागात केवळ पाच तासांच्या अवधीत तब्बल २३ ठिकाणी आग लागली. Fire News

अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत या घटना आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येते.

रविवारी (ता.१२) सायंकाळी साडेसातनंतर व्यापारी पेठेसह शहरातील वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घराच्या छतावर साठलेला पाचोळा, तसेच झाडांना आग लागण्याच्या घटना घडतात.

अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रातील नियंत्रण कक्षात नागरिकांनी आग लागल्याच्या तक्रारी नोंदविल्या. सुदैवाने यातील कोणत्याही घटनेत कोणी जखमी किंवा जिवत हानी झाली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!