पुण्यातील फ्लॅटमध्ये आगीचा वणवा ; 15 वर्षाचा मुलगा होरपळला, आग आटोक्यात आणताना गॅसचा स्फोट, 9 जण जखमी..


पुणे: पुण्याच्या उंड्री भागातील मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटीत शुक्रवारी (26 सप्टेंबर ) दुपारी अडीच वाजताच्या
सुमारास बाराव्या मजल्यावरील फ्लॅटला भयंकर आग लागली.या आगीत होरपळून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना
घडली.दरम्यान आग आटोक्यात आणताना दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह सात नागरिक असे नऊ जणही जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या उंड्री भागातील मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटीत बाराव्या मजल्यावर आगीचे लोळ खिडकीतून बाहेर आलेले नागरिकांनी दिसलें.या आगीने रौद्ररूप धारण केले होते. या भयंकर आगीत तर्ष कमल खेतान, (वय 15 वर्ष, रा. मार्वल आयडियल स्पेसीओ सोसायटी, उंड्री) या मुलाचा मृत्यू झाला. फ्लॅटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घरात बेडरुममध्ये तर्ष एकटा झोपला होता, तर त्याचे आई-वडील कामावर गेले होते.घराला आग लागल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर काही मिनिटांत तर्षच्या आईने धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान आणि सोसायटीतील काही नागरिक बारा मजले चालून वर गेले. पाणी मारुन फ्लॅटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतानाच किचनमधील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील विश्वजित मधुकर वाघ, पृथ्वीराज परमेश्वर खेडकर, सोसायटीतील रहिवासी डॉ. मृणाल मयंक (42), योगेश गिरीधर जाधव (45), झिशान साहिल खान (35), सुरक्षारक्षक विनोद मोहन लिमकर (32) यांच्यासह इतर तीन असे नऊ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासातच आग आटोक्यात आणली. काळेपडळ पोलिस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मात्र तर्शच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!