अखेर संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच घेतला मोठा निर्णय…


बीड : जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरुन राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे.

त्यातच काल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जवळपास दोन तासांपासून अधिक काळ त्यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले.

पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी “माझ्या भावाला ज्यांनी संपवलं. ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना फाशी द्या, अशी मागणी केली. आता याप्रकरणी नवीन एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसआयटीची स्थापना केल्यानंतर बीड जिल्ह्यात महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

या एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली हेच असणार आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 14 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत बीडमध्ये हे जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत.

दरम्यान, मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी आंदोलन चालू आहेत. 25 जानेवारी पासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सोबत घेऊन, सामूहिक आमरण उपोषण करणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!