सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक! 22 आणि 24 कॅरेट सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे नवे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. काही दिवसांतच सोन्याचे भाव प्रतितोळा 3 ते 4 हजार रुपयांनी वाढले होते. मात्र, आता सोन्याच्या दरात पुन्हा घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आजच्या बाजारातील दरांनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 540 रुपयांची घट झाली आहे. तर 22 कॅरेट सोनं 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 12 हजार रुपयांहून अधिक घट झाली होती. त्यानंतर सोमवारपासून बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. सलग काही दिवस दर वाढत असल्याने ग्राहक खरेदीसाठी योग्य संधीची वाट पाहत होते. आता पुन्हा भाव कमी झाल्याने लग्नसराईच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रति तोळा सोन्याचे दर किती?
उपलब्ध माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर 1 लाख 28 हजार 10 रुपये झाला आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी 1 लाख 17 हजार 350 रुपये, तर 18 कॅरेट सोन्यासाठी 96 हजार 40 रुपये मोजावे लागत आहेत.

प्रति ग्रॅम सोन्याचे दर पुढीलप्रमाणे :
– 24 कॅरेट: 12,801 रुपये
– 22 कॅरेट: 11,735 रुपये
– 18 कॅरेट: 9,604 रुपये
मुंबई-पुण्यातील सोन्याचे दर
मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये उपलब्ध माहितीनुसार सोन्याचे दर समान आहेत.
– 24 कॅरेट: 12,786 रुपये प्रति ग्रॅम
– 22 कॅरेट: 11,720 रुपये प्रति ग्रॅम
– 18 कॅरेट: 9,589 रुपये प्रति ग्रॅम
दरम्यान, दागिने खरेदी करताना सोन्याच्या दरांव्यतिरिक्त जीएसटी आणि घडणावळ शुल्कही द्यावे लागते. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानातील अंतिम किंमत नमूद केलेल्या दरांपेक्षा वेगळी असू शकते. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफांकडून ताजे दर तपासून घेणे महत्त्वाचे आहे.
