पुण्यात पुन्हा हाणामारी ; जुन्या वादातून तरुणाला १० ते १२ जणांकडून बेदम मारहाण


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना आता पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. पुण्यातील पर्वती परिसरात युवकावर जुन्या वादातून टोळक्याकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पर्वती भागात १० ते १२ जणांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून यांच्यामध्ये गाडी पार्किंगचा वाद सुरू होता. या वादातून टोळक्यानीं तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद करणारा तरुण आणि त्याला मारहाण करणारे हे पुण्यात एकाच इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. मारहाणीनंतर तरुणाने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!