सारखा बाहेर खेळतोस, आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस म्हणत बापाने मुलाचा केला खून, 9 वर्षाच्या मुलाचा बारामतीत भयंकर अंत…

बारामती : बारामतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. “तू सारखा बाहेर खेळतोस, तुझ्या आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस, असे म्हणत रागातून वडिलांनी आपल्याच 9 वर्षाच्या मुलाला भिंतीवर आपटून गळा आवळून खून केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

ही घटना होळ (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीत मुलाच्या आईसमोरच घडली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जानेवारीला दुपारी अडीचच्या सुमारास पियुष घरात असताना त्याच्या वडिलांनी अभ्यास करीत नसल्याबाबत त्याच्याशी बोलले होते.
त्याला तू सारखा बाहेर खेळतोस, तुझी आईसारखा वागत माझी इज्जत घालवतोस, असे म्हणून त्यांनी रागाच्या भरात पियुषला भिंतीवर आपटले. त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केला. यावेळी त्याची आई शालन भंडलकर हजर होती. या घटनेने सगळेच हादरले.

याबाबत पियुष विजय भंडलकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडील विजय गणेश भंडलकर, आई शालन विजय भंडलकर, आणि संतोष सोमनाथ भंडलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. घटनेनंतर संतोष भंडलकर यांनी मुलाला निरा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मुलगा हा चक्कर आल्याने पडल्याचे सांगीतले. डॉक्टरांनी पियुष मयत झाल्याचे सांगून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. मात्र, त्या तिघांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात न जाता पियुषचे प्रेत गावी नेले. याबाबत कोणालाही कळू नये म्हणून पोलीस पाटील किंवा इतरांना माहिती न देता थेट अंत्यविधीची तयारी सुरु केली होती.
याबाबत गुन्ह्याची माहिती मिळताच विजय भंडलकर व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करत आहेत. या घटनेने मात्र बारामती हादरली आहे.