मोठी बातमी! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग सेवेतून पीटीएमला वगळले, आता टोल सेवा या बँका सांभाळणार..!!


नवी दिल्ली : पेटीएम फास्टॅग संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांसाठी एक सूचना जारी केली आहे. बँकांना फास्टॅग खरेदी करण्याचे आवाहन केले असून पेटीएम पेमेंट्स बँकेचे नाव या यादीतून वगळण्यात आले आहे.

अशा प्रकारे, आता पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना आता नवीन फास्टॅग विकत घ्यावा लागेल, कारण पेटीएम पेमेंट्स बँक आता फास्टॅग सुविधा देण्यासाठी नोंदणीकृत नाही.

पेटीएम पेमेंट बँकेला फास्टॅग सेवेतून वगळण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने ९ बँकांशी हातमिळवणी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पेमेंट्स बँकेला १५ मार्चनंतर ठेवी घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे एनएचएआयला ही व्यवस्था करावी लागली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक देशभरातील २४७ टोल प्लाझाच्या टोल संकलनाचे व्यवस्थापन करते. ती या टोल प्लाझासाठी अ‍ॅक्वायर बँक म्हणून काम करते.

पेमेंट बँकेचे देशातील २४७ टोल प्लाझावर काम
एनएचएआय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सांगितले की इतर ९ बँका पेटीएम पेमेंट्स बँकेची जागा घेतील. या बँकांद्वारे सर्व २४७ टोल प्लाझावर पेमेंट केले जाऊ शकते. आरबीआयच्या निर्णयामुळे वन ९७ कम्यूनिकेशनची उपकंपनी असलेली पेमेंट बँकर वगळण्यात आली आहे. पेटीएम पेमेंट्सद्वारे चालवल्या जाणा-या या २४७ टोल प्लाझांचा दैनंदिन टोल संकलनात १९० कोटी रुपयांचा वाटा आहे. एकूण टोलवसुलीच्या हे प्रमाण १४ टक्के आहे.

या बँकांना अधिग्रहण बँका बनविण्यात आल्या
पेटीएम पेमेंट्स बँकेऐवजी एनएचएआयच्या भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनीने अ‍ॅक्सीस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेची निवड केली आहे. हे सर्वजण टोल सेवेचा व्यवसाय सांभाळतील. ते सर्व अ‍ॅक्वायर बँक म्हणून काम करतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!