शेतकऱ्यांना ‘या’ दिवशी 19 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार, उरले फक्त काही तास, जाणून घ्या…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होणार आहेत. येत्या 24 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी बिहारच्या भागलपूर इथून एका कार्यक्रमात शेतकरी सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत. यामुळे लवकरच हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दिवसापासून देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 19 व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत. तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचा लाभमिळणार आहे का नाही यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी तपासू शकता.
या योजनेअंतर्गत देशातील 13 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 हप्ते जमा करण्यात आले आहेत. यामुळे पुढील हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यानंतर शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे प्रतीक्षा लागले आहे. दरम्यान या योजनेचा 19 वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. याची तारीख आणि किती पैसे मिळणार याबद्दल माहिती समोर आली आहे.

माहिती घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्या ठिकाणी बेनिफेसरी लिस्ट या पर्यायावर क्लिक करून, या ठिकाणी तुमचा विभाग जिल्हा तालुका गाव निवडून लाभार्थी यादी तुमचे नाव तपासावी लागेल. अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट चेक करू शकता.
दरम्यान, या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ई केवायसी प्रक्रिया केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता दिला जाणार नाही.