शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता अडकला? तर ‘या’ नंबरवर करा तक्रार, जाणून घ्या..


नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१वा हप्ता देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या निधीची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही हप्ता जमा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

वर्षातून सहा हजार रुपये आर्थिक मदत देणारी ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, दर चार महिन्यांनी दोन हजारांचा हप्ता शेतकऱ्यांना दिला जातो. नुकताच १९ नोव्हेंबर रोजी २१वा हप्ता वितरीत करण्यात आला. ऑगस्ट महिन्यात २०वा हप्ता जमा झाला होता.

पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना तर आधीच हा हप्ता मिळाला होता. परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसा जमा झाला नाही. त्यामुळे नेमकं हप्ता का अडकला आणि काय करावं, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांचा हप्ता अडकण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अपूर्ण ई-केवायसी , आधार-खाते लिंक न होणे किंवा बँक खात्यातील तांत्रिक त्रुटी. अनेक वेळा नोंदणी करताना चुकीची माहिती टाकली जाते किंवा खाते निष्क्रिय असल्याने रक्कम परत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणी तपशीलांची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

याशिवाय, काही जिल्ह्यांमध्ये डेटा पडताळणीच्या विलंबामुळेही हप्ता उशिरा मिळू शकतो. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे कृषि विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी तीन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. शेतकरी pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in या अधिकृत ई-मेल आयडीवर आपली समस्या नोंदवू शकतात. तसेच ई-मेलमध्ये नाव, नोंदणी क्रमांक, समस्या आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

दरम्यान, दुसरा पर्याय म्हणजे हेल्पलाइन नंबरवर थेट संपर्क. ०११-२४३००६०६ किंवा १५५२६१ या हेल्पलाइनवर कॉल करून तक्रार नोंदवता येते. तर तिसरा आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे टोल-फ्री नंबर — १८००-११५-५२६. या क्रमांकावर शेतकऱ्यांना थेट मदत आणि मार्गदर्शन मिळू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!