सहा देशांमध्ये बसलेल्या धर्मांध खलिस्तान समर्थकांचा अमृतपालला पाठिंबा…!
नवी दिल्ली : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहवर झालेल्या कारवाईमुळे जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या समर्थकांनी भारतीय उच्च आयुक्तालयासमोर निदर्शनं करून तोडफोड केली होती. यातच आता मिळालेल्या माहितीनुसार सहा देशांमध्ये बसलेले धर्मांध खलिस्तान समर्थक अमृतपालच्या बाजूने आणि पंजाबच्या विरोधात अनेक वर्षांपासून कट रचत आहेत. अमृतपाल सिंग हा देखील या कटाचा एक भाग आहे. ही सारी रणनीती पाकिस्तानच्या माध्यमातून कॅनडा, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियात बसलेल्या नऊ बंदी असलेल्या संघटनांचे लोक रचत आहेत.
पंजाबमधील शांतता एक प्रकारे बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांना भक्कम पुरावे मिळाले आहेत. इतकंच नाही तर पंजाब पोलीस या प्रकरणी डॉजियरही तयार करत आहेत. तो येत्या काही दिवसांत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे, जेणेकरुन भारताने जेव्हा हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडला तर ते उघड करता येईल.