प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं पुण्यात निधन …!


पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री आणि नाट्य कलाकार उत्तरा बावकर (79 ) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. एक वर्षापासून आजारी असलेल्या बावकर यांनी पुण्यातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

 

बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

 

दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. बावकर यांनी ‘मुख्यमंत्री’मध्ये पद्मावती, ‘मेना गुर्जरी’मध्ये मेना, शेक्सपियरच्या ‘ऑथेलो’मध्ये डेस्डेमोना आणि नाटककार गिरीश कर्नाड यांच्या ‘तुघलक’ नाटकात आईची भूमिका केली होती. गोविंद निहलानी यांच्या ‘तमस’ या चित्रपटातील भूमिकेनंतर त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!