मनोज जरांगे यांना फडणवीसांच्या विरोधात बोलायला लावणे हे कोणाचे पाप? विजय विड्डेवार यांचा सवाल..


मुंबई : राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेले असताना, राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १०% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीतुन आरक्षण हवय अशी, भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसेच जरांगे हे भाजप नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ही काही मॅच फिक्सिंग आहे का? जरांगे पाटील यांनी एक पाउल पुढे टाकले ते पुढे असावे. तसेच ज्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल ते बोलत आहेत त्यांनी अशी भाषा वापरू नये. सत्ताधारी आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली हा त्यांच्यातला प्रश्न आहे.

तर जरांगे यांना असे बोलायला लावणं हे पाप कुणाचे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. चर्चेसाठी भाजपचेच लोक जात होते. तुम्ही जे पेराल ते उगवते. विश्वास कुणावर ठेवायचा, अशी माणसे फोडून अनेक बंड झालेत, असे सांगत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली तसेच मनोज जरांगेना सल्लाही दिला आहे.

तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू
आजपासून राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे अधिवेशन अंतरिम अधिवेशन आहे. प्रश्न उत्तर नाहीत तर लक्षवेधी तरी ठेवा, उद्या आम्ही स्थगन मांडू. विरोधकांचा प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही चिंधड्या उडवू. सर्व पाप तुम्ही करायचे आणि आरोप मात्र विरोधकांवर करत टीका करायची असं ते म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!