‘साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष पॅक करून परत पाठवून द्या’, फडणवीसांनी पवारांना पुन्हा डिवचल

मुंबई : सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. त्यांनी निपाणीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.
यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निपाणी येथे राष्ट्रवादीकडून उत्तम पाटील यांना तिकीट दिले आहे. राष्ट्रवादीचे कार्नाटक विधानसभेत एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांनी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष अशा खोचक शब्दात हल्ला चढवला.
फडणवीसांनी राष्ट्रवादी पक्षाची खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आणि आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे.
हा पक्ष काय डोंबले करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे, हे एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून महाराष्ट्रात पाठवून द्या, असेही फडणवीस म्हणाले.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता कर्नाटक निवडणूकीत रंगत वाढली आहे.