महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ; एमआयएमची अजित पवार गट आणि शिदें गटाशी हातमिळवणी, कुठे एकत्र लढणार?


पुणे: राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना अनपेक्षित युतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. भाजपने काँग्रेस व एमआयएमसोबत युती केल्यानंतर आता शिंदे आणि अजित पवारांनी एमआयएमसोबत युती केली असल्याची माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेत शिंदे गट,एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने युती केली आहे.या परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली.

या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -16 , शिवसेना शिंदे गट – 2,एमआय एम – 1,अपक्ष – 4 अशा 24 जणांचा समावेश आहे. या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश आहे. दरम्यान आगामी निवडणुकीसाठी महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष अजित पवार गट आणि शिंदे सेन एमआयएमसोबत गेल्याने भाजपच्या स्थानिक गोटात अस्वस्थता असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान या युतीवर विरोधकांनी शिंदे गटाला घेरताना कुठे हिंदुत्व असा सवाल केला आहे. शिवसेना शिंदे गटाने एमआयएमसोबत केलेली युती ही राज्यात आता चर्चेचा विषय ठरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!